मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, ‘दबंग 3’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मध्ये सलमान खान आणि सई मांजरेकर यांची जोरदार केमेस्ट्री दिसून येत आहे. त्यामुळे दबंग 3 चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरणार असल्याचे ट्रेण्ड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे वादग्रस्त विधानांनामुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खानने या चित्रपटाचा ट्रेलरवर चांगलीच टीका केली आहे.
Trailer of #Dabangg3 is super flop. Whatever songs released all flop. Means this film has gone far away from multiplex audiences. Now only Rickshawalas n other Lukkhas will watch this film. Means it can’t do more than ₹150Cr lifetime business. Means it’s going to be super flop.
— KRK (@kamaalrkhan) November 28, 2019
काही दिवसांपूर्वी, ‘दबंग 3’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर तसेच टिझर प्रदर्शित झाला. या टिझरला सोशल माध्यमांमध्ये चांगलीच दाद मिळत असली तरी कमाल आर खानने ट्विटद्वारे दबंग 3 चित्रपटाच्या ट्रेलरला सुपर फ्लॉप असं म्हटलं आहे.तसेच चित्रपटातील गाणीदेखील फ्लॉप आहेत. असे असले तरी रिक्षाचालक चित्रपट पाहण्यासाठी जातील. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त १५० कोटींची कमाई करु शकतो. म्हणजेच हा चित्रपट सुपरफ्लॉप असणार अशी भविष्यवाणी करत त्यांनी सलमानवर खोचक टीका केली आहे.
दरम्यान, ‘दबंग 3’ चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. येत्या 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.