मुंबई – कृती सेननने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक बहारदार सिनेमांमध्ये काम केले आहे. “राबता’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कृती सेननजवळ सध्या अनेक सिनेमांच्या असाइन्मेंट आहेत.
त्यातील एक “मिमी’ हादेखील कृतीचा असाच एक एकदम हटके सिनेमा असणार आहे. यामध्ये कृती एकदम वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीज केला जाणार आहे. दिनेश विजनच्या डायरेक्शनखाली तयार होणाऱ्या या सिनेमाची कथा सरोगेट मदर या विषयाशी संबंधित आहे.
सध्या लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज व्हावा, असे दिनेश विजन यांना वाटते आहे. अर्थात निर्मात्यांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तशी घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
कृती सेननने अलीकडेच तिच्या “भेडिया’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर पुन्हा एकदा वरुण धवन दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमारबरोबर “बच्चन पांडे’मध्येही ती दिसणार आहे.