बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, त्याचा अजूनही थांगपत्ता लागला नाही. कृष्णा आंधळे सापडणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे. तसेच यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
कृष्णा आंधळेकडे जास्त पुरावे असतील. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करत आहे. तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी करणे गरजेची आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान, तीन महिने झाले तरी अद्याप कृष्णा आंधळेचा शोध लागलेला नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा आंधळे कोण आहे?
कृष्णा आंधळे बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवासी आहे. कृष्णाचं वय 27 वर्ष आहे. कृष्णा आंधळेकडे स्वत:ची शेतजमीन आहे. त्याचसोबत वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची टोळी आहे. आणि या टोळीचा तो मुकादम असल्याचं बोललं जातं. कृष्णावर आतापर्यंत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि हे सहाही गुन्हे गेल्या 4 वर्षात दाखल झालेले आहेत. 2020 मध्ये कृष्णा आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झाला. कृष्णावर हत्या, धमकी देणं, हाणामारी करणं, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत.