KRA Jewellers: समाज आणि संस्कृतीप्रती असलेल्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पुण्यातील कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने नुकतेच हस्ताक्षर विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधत पुणे, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांतील विविध शाळांमध्ये सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर यांनी दिली. KRA Jewellers, Handwriting development workshops याविषयी अधिक माहिती देताना अतुल अष्टेकर म्हणाले, “देवनागरी लिपी ही आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असून या लिपीचे जतन करीत भावी पिढ्यांना सक्षम करण्यामध्येच खरा विकास आहे असे आम्ही मानतो. हेच उद्दिष्ट्य समोर ठेवत के आरए ज्वेलर्सच्या वतीने ही हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तरुण विद्यार्थ्यांमध्ये देवनागरी लिपीचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने करण्यात येत असलेल्या यशस्वी प्रयत्नांचा हा एक भाग असून या कार्यशाळांच्या माध्यमातून, लेख अभिव्यक्तीमध्ये स्पष्टता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचे आमचे ध्येय आहे.” नागराज मलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सदर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील पुणे, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मुख्य शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळांना ४० हून अधिक शाळांमधून तब्बल १०हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. |