#KPLFixing : बेलगावी पँथर्स संघाचे माजी प्रशिक्षक सुधिंद्रा शिंदेंना अटक

बेंगळुरू : कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेले मॅच फिक्सिंग प्रकरण काही शांत होताना दिसत नाही. आता या प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचने बुधवारी कर्नाटक प्रीमियीर लीगमध्ये झालेल्या मॅच प्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीतील सदस्य सुधिंद्रा शिंदे यांना अटक केली आहे.

शिंदे यांच्या घरावर सोमवारी छापा टाकण्यात आला होता. त्यांच्याविरूध्द पुरावे हाती लागल्याचे पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी सांगितले. रायचूर झोनचे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शिंदे कर्नाटकसाठी १८ प्रथम श्रेणी आणि एक लिस्ट- ए चे सामने खेळले आहेत. तसेच शिंदे हे बेलगावी पँथर्स संघाचे प्रशिक्षकही होते. शिंदे आणि अली अशफाफ तारा यांनी काही सामने फिक्स केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

केपील मॅच फिक्सिंग प्रकरणी ही नववी अटक आहे. शिंदेआधी बेलगावी पँथर्स संघाचे मालक अशफाफ अली, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना, बेंगलुरू ब्लास्टर्सचे निशांत सिंह शेखावत, गोलंदाजी प्रशिक्षक वीनू प्रसाद, फलंदाज एम विश्वनाथन, बेल्लारी तस्कर्सचा कर्णधार सीएम गौतम, अबरार काजी आणि आंतरराष्ट्रीय सट्टेबाज सयम गुल्लाटी यांना अटक करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.