KP Sharma Oli | नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओली चौथ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी आज (सोमवारी)नेपाळचे चौथे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) पक्षाचे प्रमुख के.पी. शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.
शेर बहादुर देऊबा यांच्या नेपाळी कॉंग्रेसबरोबरच्या नवीन आघाडी सरकारचे ते नेतृत्व करणार आहेत. अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी ओली यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. चौथ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओली यांचे अभिनंदन केले आहे.
मोदींनी दिल्या शुभेच्छा
पीएम मोदींनी लिहिले, ‘चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन. आम्हाला आशा आहे की आमच्या दोन्ही देशांमधील मैत्री अधिक घट्ट होईल आणि दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करतील, अशी आशा आम्ही बाळगतो.’
Congratulations @kpsharmaoli on your appointment as the Prime Minister of Nepal. Look forward to working closely to further strengthen the deep bonds of friendship between our two countries and to further expand our mutually beneficial cooperation for the progress and prosperity…
— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2024
केपी शर्मा ओली हे CMN-UML पक्षाचे अध्यक्ष आहेत. नेपाळी संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले. माओवादी सेंटरचे प्रमुख प्रचंड यांनी मांडलेला विश्वास दर्शक ठराव संसदेत मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे प्रचंड यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर ओली यांना सरकार स्थापन करण्यास अध्यक्ष राम चंद्र पौडेल यांनी पाचारण केले होते.
त्यानंतर ओली यांनी सरकार स्थापनेसाठी 165 सदस्यांच्या सह्या राष्ट्रपतींकडे सादर केल्या, त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेला मंजुरी दिली. या 165 सदस्यांपैकी 77 सदस्य ओली यांच्या पक्षाचे (CPN-UML) होते तर 88 सदस्य नेपाळी काँग्रेसचे होते.
कोण आहेत केपी शर्मा ?
1952 मध्ये जन्मलेल्या ओली यांनी वयाच्या 12 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. मार्क्स आणि लेनिन यांच्यावर प्रभाव पडला आणि तो साम्यवादी राजकारणात गेले. 1966 पर्यंत त्यांनी नेपाळच्या कम्युनिस्ट राजकारणात प्रवेश केला होता. 1970 मध्ये, ओली वयाच्या 18 व्या वर्षी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले.14 वर्षे तुरुंगातही होते.
पुढे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. 1991 मध्ये ओली एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी चळवळीचे नेते बनले. नंतर दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करून सीपीएन-यूएमएलची स्थापना झाली. 2006 ते 2007 पर्यंत ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री होते.
केपी शर्मा ओली चौथ्यांदा पंतप्रधान बनले
केपी शर्मी ओली यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा नेपाळची कमान हाती घेतली. 12 ऑक्टोबर रोजी ते पहिल्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले. 4 ऑगस्ट 2016 पर्यंत 297 दिवस ते या पदावर होते. यानंतर, 15 फेब्रुवारी 2018 रोजी ते पुन्हा एकदा नेपाळचे पंतप्रधान झाले आणि 13 मे 2021 पर्यंत या पदावर राहिले. त्यानंतर ते पुन्हा 60दिवसांसाठी नेपाळचे पंतप्रधान झाले. त्याच वेळी, 15 जुलै 2024 रोजी ते चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले आहेत.
हेही वाचा:
छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी कोणत्या विषयावर झाली चर्चा?