कोल्हापूर – कोल्हापूर-मुंबई लोहमार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस दुहेरीकरणाच्या कामामुळे बुधवारी (दि.30) ते 2 जानेवारी 2021 या दरम्यान चार दिवस रद्द करण्यात आली आहे. कोयना एक्सप्रेस मिरज-पुणे मार्गावरील सिंदवणे-आळंदी येथे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या चार दिवसांमध्ये मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे यामार्गावरून धावणारी कोयना एक्सप्रेस चार दिवस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी मुंबईहून येणारी कोयना एक्सप्रेस पुणे येथपर्यंत धावणार आहे.