कोयनानगर – कोयना धरण परिसर गाढ साखरझोपेत असताना पहाटे 3:53 वाजता भूकंपाच्या सौम्य धक्क्याने जागा झाला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. पहाटे निरव शांतता आसल्याने बसलेल्या हा धक्का कोयना परिसरात मोठया प्रमाणात जाणवला आहे.
7 मे रोजी पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून उत्तरेला 50 किमी अंतरावर आहे. या धक्क्याने पाटण तालुक्यात कसलीही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी सांगितले आहे. तर या धक्क्यामुळे कोयना धरणाला कसलीच इजा झाली नसल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले आहे.