कोयना दरवाजे पाच फुटांवर

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे धरणाचे आठ फुटांवर असणारे दरवाजे पाच फुटांवर करण्यात आले आहेत. सध्या धरणात 45 हजार 681 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या दरवाजामधून 45 हजार 681 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पत्रात करण्यात येत आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. कोयना पाणलोट क्षेत्राच्या महाबळेश्‍वर, नवजा, कोयना याठिकाणी पडणारा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे  धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. सध्या धरणात 45 हजार 681 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या कोयना धरणात पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात पाण्याची आवश्‍यकता नसल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या धरणातून 45 हजार 681 क्‍युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत असल्याने कोयना नदीकाठी असणाऱ्या गावांचा धोका टळला आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पाण्याखाली असणारे मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. दरम्यान, गेल्या सोळा तासात कोयनानगर याठिकाणी 115 मिलिमीटर, नवजा येथे 164 मिलिमीटर, महाबळेश्‍वर येथे 143 मिलिमीटर, वळवण येथे 148 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 2161.11 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)