विसगाव खोरे – ग्रामिण भागामध्ये व्हेंटीलेटर व ऑक्सीजन बेड तसेच कोविड सेंटर त्वरित सुरु करावे अशी मागणी रणजीत शिवतरे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद यांनी केली. कोरोना संसर्ग -जन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुणे जिल्हयातील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत पुणे जिल्हयातील लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व इतर मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत पुढील विषयांची मागणी केली.
पुणे जिल्हयातील ग्रामिण भागामध्ये व्हेंटीलेटर व ऑक्सीजन बेड तसेच डी.सी.एच सी त्वरित सुरु करावी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहिका खरेदी संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले असून त्यास मंजूरी देणेबाबत मागणी केली.
पुणे जिल्हयात भोर,वेल्हा, मुळशी,मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर इ. पश्चिम पट्टयातील तालुक्यां -मध्ये मोठया प्रमाणात भात शेतीची लागवड केली जाते, अत्यल्प पावसामुळे या वर्षी 50 % भातशेतीची लागवड झाली व लागवड झालेल्या भातशेतीचे तसेच इतर पिके पावसाअभावी वाया गेले आहेत, तसेच दिनांक 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे पिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाले.
या सर्वांमुळे शेतक-यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कमी पावसामुळे दोन्ही प्रकारच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होऊन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्या साठीची मागणी केली, अशी माहिती रणजीत शिवतरे यांनी दिली,