Kothrud Assembly Constituency । राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. त्यातच पुण्यातील कोथरूड मधून चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत .
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पाचवी फेरी पार पडली त्यावेळी चंद्रकांत पाटील 24339 मतांची आघाडी घेतली होती.
पहिल्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी 5749 मतांची आघाडी घेतली आहे.