मुंबई – कोटक महिंद्रा बँकेने शनिवारी आपला तिसर्या तिमाहिचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार या बँकेचा नफा 10.22 टक्क्यांनी वाढून 4,701 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित या बँकेला 4,265 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
तर दुसर्या तिमाहित म्हणजे सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेचा नफा 5,044 कोटी रुपये होता. म्हणजे तिमाही पातळीवर बँकेचा नफा कमी झाला आहे. तर वार्षिक पातळीवर नफा वाढण्यात मदत झाली आहे. बँकेने जाहीर केलेल्या पत्रकानुसार बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता वाढून 1.50% झाली आहे.
गेल्या वर्षी तिसर्या तिमाहित बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 1.49% इतकी होती. या बँकेच्या निव्वळ अनुत्पादक मालमत्तेत फारशी वाढ झालेली नाही. खराब कर्जापोटी या तिमाहीत बँकेला 794 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी यादी तिमाहीत या बँकेला खराब कर्जापोटी 660 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती. आगामी काळात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बँकांच्या उलाढालीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.