सोरतापवाडी – कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील इनामदार वस्ती याठिकाणी रिद्धीसिद्धी मेडीकल फाऊंडेशन संचलित, चिंतामणी हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त रविवारी (दि. 14) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अमेय वीर व डॉ. हारुण यांनी केले आहे.
या शिबिरात उंची, वजन, रक्तदाब, ऑक्सीजन पातळी, बॉडी मास निर्देशांक, बीएसएल, ईसीजी आदी तपासण्या मोफत होणार आहेत. तर रक्तातील साखरेची पातळी, छातीची पट्टी (ईसीजी), रक्तातील किडनीचे कार्य, रक्तातील चरबीचे प्रमाण, रक्तातील साखरेची 3 महिन्याची सरासरी पातळी, मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम तपासणी, मधुमेहामुळे किडनीवर होणारे दुष्परिणाम आदी तपासण्या सहभागी नागरिकांसाठी माफक दरात करण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.