कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायत पचवार्षिक निवडणुकीमध्ये जय मल्हार पॅनेलच्या वॉर्ड क्र. 5 मधील उमेदवार अमोल गव्हाणे, जयश्री गव्हाणे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार नागनाथ गव्हाणे, मनोज ढेरंगे, रोहिणी गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर पाठिंबा दिला असल्याने कोरेगाव भीमाच्या राजकीय पटलावर महत्वपूर्ण घडामोडी पाहायला मिळत आहे.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 17 जागांसाठी जय मल्हार पॅनल विरुद्ध श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. यापूर्वी जय मल्हार पॅनलच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनलची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.
आज जय मल्हार पॅनलच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कैलासराव सोनवणे, अनिल काशिद, अरविंद गव्हाणे, मुरलीधर गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी जय मल्हार पॅनेलच्या वॉर्ड क्र. 5मधील उमेदवार अमोल गव्हाणे, जयश्री गव्हाणे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार नागनाथ गव्हाणे, मनोज ढेरंगे, रोहिणी गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर पाठिंबा दिला.
समाजात शांतता सुव्यवस्था राहावी व भावकीमध्ये वाद विवाद नको म्हणून आणि विरोधासाठी विरोध नको म्हणून आम्ही स्वखुशीने बिनशर्त पाठींबा देत आहोत, असे सर्व पाठिंबा देणाऱ्या उमेदवारानी सांगितले.
वॉर्ड क्रमांक 5 मधील दोन जागांना पाठिंबा दिला असल्याने याठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या गटात जय मल्हार पॅनलच्या मनिषा संपत गव्हाणे व भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या राजश्री महेंद्र भांडवलकर यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे.