कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा येथे करोना बाधित रुग्ण मिळाल्याने प्रशासनाने खबरदारी घेत तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. याबाबत प्रांत संतोषकुमार देशमुख यांनी दि.28 मे रोजी आदेश दिला आहे.
या आदेशात कोरेगाव भीमा येथील ढेरंगेवस्ती, ओरिएन्टल रबर इंडस्ट्रीज प्रा. लि., ओम पॅकेजिंग, सद्गुरू ऑईल मिल, गुगळे वेअर हाउस, थर्मन प्रा. लि., आदी परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंन्ट) व कोरेगाव भीमा (ढेरंगे वस्ती) परिसर केंद्रस्थानी धरून 5 किमीचा परिसर हे क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून दि. 28 मेपासून पुढील 14 दिवसांसाठी घोषित केला आहे.
करोनाबाधित 31 वर्षीय रुग्णाची पत्नी व मुलगी यांचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल आज (दि. 31) निगेटिव्ह आला. तसेच या व्यक्तीची प्रकृत्ती स्थिर असल्याचे वैद्यकीय सेवक मारणे यांनी सांगितले.