कोपरगावकरांना महिन्याला मिळणार चार वेळा पाणी

कोपरगाव – शहराला तीव्र पाणीटंचाईचा भेडसावत असल्याने पाणी करण्यात आले होती. नुकतेच गोदावरी कालव्याचे आवर्तन आल्याने साठवण तलाव भरण्यात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने आठ दिवसांनी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीटंचाईने हैरान झालेल्या कोपरगावकरांना सुखद दिलासा मिळाला आहे. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पाण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी येणार, याची माहिती मिळणार आहे. तसेच महिन्यात नागरिकांना चार वेळा पाणी मिळणार आहे. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी भागनिहाय, टाकीनिहाय 26 ते 29 मेदरम्यान शहरासाठी पहिल्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पाऊस व धरणातील पाणीसाठा याच्या परिस्थितीनुसार नियोजन व सदर पाणीपुरवठ्याबाबत बदल करण्यातही येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

पाण्याच्या त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक भागाला पाणीपुरवठा केल्यानंतर त्या भागात असणाऱ्या नळजोडण्या, संख्या व त्यांना लागलेले पाणी याचा हिशोब जनतेसमोर मांडावा. जेणेकरून कोणत्या भागात पाण्याचा अपव्यय होतो, लिकेजचे प्रमाण जादा आहे, हे लक्षात येईल. त्यावर उपाययोजना करण्यास सोपे होईल. त्यामुळे पाणी चोरीला ही आळा बसू शकेल आणि भविष्यात साठवण तलाव कोपरगावच्या पाणीपुरवठ्याचे गणित व्यवस्थित करता येईल. आठ दिवसांनी पाणी देऊन महिन्याला चार पाणी देण्याचा निर्णय पालिकेने घोषित केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.