कोपरगावला करोनासंसर्गाची लागण होणार!

ग्रामीण रुग्णालयात बाधीत क्षेतील कर्मचारी आरोग्य विभागात कामाला

कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्याच्या आजुबाजुच्या तालुक्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच येवला शहरात बुधवारी सकाळपर्यंत २५ बाधीत रुग्ण आढळल्याने कोपरगाकरांची चिंता वाढली आहे. तसेच येवला येथून कोपरगाव येथे दररोज कामासाठी व इतर व्यवहारीक देवान घेवान उद्योग व्यवसाया निमीत्त दररोज किमान दोन हजार नागारीक ये-जा करीत असतात.

विषेश म्हणजे येवला ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांना करोना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. त्याच ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काम करणारी एक महीला कर्मचारी राहते. ती दररोज येवल्याहून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात कामासाठी येते शिवाय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ती रुग्णांचे केस पेपर काढण्याचे काम करते तोच कूस पेपर संपुर्ण रुग्णालयात प्रत्येक टेबलवर आरोग्य विभागाचे कर्मचारी हातळतात. तसेच सध्या तालुक्यातील नागरीक,मजूर परराज्यात व जिल्ह्यात आपल्या गावी जाण्यासाठी कोपरगाव रुग्णालयातून वैद्यकीय दाखले काढण्यासाठी अर्थात फिटनेस सर्टिफिकेटसाठी गर्दी केली आहे.

गेल्या तिन दिवसात ५०० पेक्षा ज्यास्त नागरीकांना वैद्यकीय दाखले देण्याचे काम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना करावे लागले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी रात्रंदिवस नागरीकांची तपासणी करुन वैद्यकीय दाखले देत आहेत मात्र दाखले काढण्यासाठी नागरीकांनी रुग्णालयात गर्दीचा उच्चांक झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराला करोना संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. रुग्णालयात वाढलेली गर्दी आणि येवल्यातून येणारे कर्मचारी नागरीक यांच्यामुळे सुरक्षित असलेला कोपरगाव तालुका असुरक्षीत होण्यास वेळ लागणार नाही.

दरम्यान शहरात तिन दिवस पालेभाज्या,फळे सह आत्यावश्यक वस्तुंची खरेदी विक्री करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. पालेभाज्या,फळे व इतर साहीत्य,वस्तुंची विक्री करण्यासाठी शेजारच्या तालुक्यासह मालेगाव येथुन छोटे मोठे व्यापारी येत असतात. कोपरगाव तालुक्यातील अनेक फळबागा मालेगावच्या बागवानांनी खरेदी केलेल्या आहेत त्यामुळेच बाधीत क्षेत्रातील नागरीकांची आवक जावक कोपरगावमध्ये होत आहे. तालुक्याच्या सिमा कितीही बंद केल्या तरी घुसकीच्या मार्गाने घुसखोरी सुरु आहे.

पंधरा दिवसापुर्वी येवला तालुक्यात एकही करोना बाधीत रुग्ण नव्हता मात्र एक महीला मालेगावला जावून वानवळा आनल्या सारखे करोनाचा वानवळा येवल्यात घेवून आली. त्यानंतर एकमेकांना लागण होवून तब्बल २५ लोक बाधीत झाले तर मालेगावा तर करोनाने कहर केला आहे. शासकीय व गुप्त मृत्युच्या आकड्यात मोठी तफावत आढळत असल्याने मालेगाव शहरातील करोनाबाधीतांची व मृत्यु पावलेल्यांचे आकडे प्रशासनाकडे जुळत नाहीत. मालेगावचे संबध येवला कोपरगावशी जवळीकचे आहेत. अनेक नातेसंबधा आहेत. अशातच आरोग्य विभागाती कर्मचारी बाधीत येवल्यात आहेत त्याचा थेट संबंध कोपरगाव शी संलग्न असल्याने कोपरगावचा धोका अधिक आहे.

शहरात गर्दीवर कुठेच नियंत्रण राहीले नाही. शासकीय कार्यालयापासून सामुदायीक ठिकाणा पर्यंत आणि राजकीय, प्रशासकीय बैठका पासुन खरेदी विक्री पर्यंत सर्वच ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून सामाजिक अंतर ठेवण्याच्या कायद्याचा फज्जा उडाला आहे. तेव्हा आजपर्यंत सुरक्षित असलेला कोपरगाव तालुका असुरक्षित वाटतोय. प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहून नागरीकांनी दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा करोनाचा धोका निश्चित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.