कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील करोना बाधीत ५५ वर्षाच्या महीलेचा मंगळवारी १४ एप्रिल रोजी पहाटे अहमदनगर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर तालुक्यातील शिंगणापुर येथील ६५ वर्षी महीलेला करोनाच्या विषाणू संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याच्या संशयाने तपासणी केली असता ती बाधीत नसल्याचा वैद्यकीय अहवाल अर्थात निगेटीव्ह आला मात्र तीचाही पहाटे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. एकाच दिवशी एकाच वेळी एकाच तालुक्यातील २ महीलांचा मृत्यु झाल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून करोनाचा संसर्ग नसलेला कोपरगाव तालुका होता परंतु अचानक ९ एप्रिल रोजी एक महीला करोना बाधीत असल्याचे उघड झाल्यानंतर तालुक्यातील नागरीक चिंताग्रस्त झाले. बाधीत झालेली महीलेला करोनाची बाधा कुणामुळे झाली याचा शोध प्रशासकीय यंत्रणा घेत आहे.करोना बाधीत महीलेच्या संपर्कात आलेल्या १८ संशयीत लोकांचे स्त्राव वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले होते त्या सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले की, करोना बाधीत महीलेवर अहमदनगर येथील बुथ हॉस्पिटलमध्ये सुरूवातीला उचार सुरू होते त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या महीलेला निमोनिया व करोनाचा संसर्ग झाल्याने रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमी झाली आणि मंगळवारी पहाटे पावने पाचवाजता बाधीत महीलाचा अंत झाला. या महीलेचे घरातील ७ नातलग करोना संशयीत म्हणन आरोग्य विभागाच्या निगरानीखाली ताब्यात ठेवले आहेत. या बाधीत महीलेचा अंतविधी घरी न देता नगर येथे वैद्यकीय पध्दतीने केला जाणार आहे. तर तालुक्यातील शिंगणापुर येथील ६५ वर्षाच्या एका महीलेला निमोनिया व इतर आजाराची लागण झाल्याने आरोग्य विभागाने महीलेची करोना विषाणु संसर्ग असण्याचा व्यक्त करीत तीची वैद्यकीय तपासणी १० एप्रिल रोजी अहमदनगर येथे केली तीचा करोना संदर्भातील वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने पुन्हा संशयीत म्हणुन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात १३ एप्रिल रोजी उपचारासाठी ठेवण्यात आले मात्र मंगळवारी पहाटे पावने पाच वाजता या संशयीत महीलेचा मृत्यु झाला आहे अशी माहीती फुलसौंदर यांनी दिली.
दरम्यान करोना बाधीत व संशयीत दोन महीलांच्या मृत्युने प्रशासकीय यंत्रणची एकच पळापळ सुरु झाली आहे. कोपरगाव मध्ये सध्या एकही करोना बाधीत रुग्ण नाही. बाधीत महीला रहात असलेला लक्ष्मीनगर परिसर सिल करण्यात आला आहे. परिसराती १ हजार २०० घरांतील नागरिकांची वेळोवळी तपासणी केली जात आहे. संशयीत १८ जनांना शहरातील विविध ठिकाणी ठेवण्यात आले असुन पुढील १३ दिवस टप्प्या टप्प्याने त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत.अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.