कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

कोपरगावात लाठीमार; दीडशे जणांवर गुन्हे दाखल

कोपरगाव – प्रगत शिवाजी संयुक्त गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत मध्येच गणपती घुसवल्यावरून या मंडळात व राजमुद्रा गणेश प्रतिष्ठान मंडळात वादावादी झाली. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे यांची प्रगत शिवाजी मंडळातील सुमित बिडवे यांने कॉलर धरून छातीवर व तोंडावर बुक्की मारली. मंडळातील कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. मंडळातील प्रमुख 24 व इतर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने आठ ते दहा जण जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मुख्य मिरवणुकीत सामील होणाऱ्या मंडळांना मिरवणूक मार्गात क्रमाक्रमाने गणपती विसर्जन करण्याबाबत सूचना देऊन तशा नोटिसा दिल्या होत्या.रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रगत शिवाजीरोड संयुक्त मंडळाचा गणपती ढोलपथकासह विघ्नेश्वर चौकात आला. त्या मंडळातील विजय चव्हाण, अमृत काकड, वैभव सुधाकर आढाव, लक्ष्मण बागुल, विजेंद्र सदाशिव आदमने, विशाल अंबादास लकारे, नितीन राजेंद्र आढाव, भूषण नरोडे, विक्रांत कुदळे, सागर नरोडे, रवी डमळे, मानस लचके, साई नरोडे, योगेश शिंदे, अमोल महाले, रोहित आढाव, योगेश शेलार, विकास आढाव, अंबादास नरोडे, सतीश भगत, महेश मते, मनोज आढाव, महेश आढाव, विशाल आढाव, सुमित बिडवे आदींनी येथूनच मिरवणूक काढू द्या, असा आग्रह धरला.

पोलिसांनी त्यांना नगरपालिका रस्त्याने येण्यास सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना दमबाजी केली. त्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. पुन्हा पावणेसहा वाजता भाजी मार्केटजवळ प्रगत शिवाजी व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांत मिरवणुकीच्या क्रमांकावरून भांडणे झाली. सर्व पोलीस अधिकारी व पथक तेथे पोहचले.

कार्यकर्त्यानी आक्रमक होऊन पोलिसांशी हुज्जत घातली.बिडवे याने पाखरे यांची कॉलर पकडून छातीवर व तोंडावर बुक्क्‌या मारून “पोलिसांची काय लायकी आहे. तुम्हाला पाहून घेतो,’ असे महणून त्याने व सोबतच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. पोलिसांच्या अंगावर ते धावून आले. पोलिसांनी सौम्य व नियंत्रित बळाचा वापर करून त्यांना काबूत आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)