कोपरगाव विधानसभा मतदारसंघ: मतदान केंद्रावर मोठ्या रांगा;मतदारांमध्ये उत्साह

कोपरगाव: कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून काही मतदान केंद्रावर गर्दी झाली. भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पती साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी सकाळी सव्वा सात वाजता कोपरगाव तालुक्‍यातील येसगाव वस्तीच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

कोपरगाव शहरातील महादेव नगर भागातील नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील मतदान केंद्र क्रमांक 137 वर मतदानासाठी मोठ्या रांगा पहावयास मिळाल्या. पहिल्या तासात तब्बल शतकी पार मतदान करून या केंद्राने उच्चांक गठला. काही ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावून तरुण मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा दिली.

दरम्यान मतदार संघात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची रिमझिम सुरू होती मतदान केंद्र आणि परिसरामध्ये चिखलमय वातावरण झाल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाताना चिखलातून वाट काढीत मोठी कसरत करावी लागत आहे. शहरांमध्ये ढगाळ वातावरणामुळे अंधार पडला आहे. कर्मचारी मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पुर्ण करीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.