गणेशत्सवासाठी कोकण रेल्वे आतापासूनच फुल्ल

मुंबई –  यंदाचा गणेशत्सव २ सप्टेंबरपासून सुरु होत असून आतापासूनच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे (रेल्वे) आरक्षण फुल झाल्याचे चित्र दिसून येते आहे. यंदा २९ ऑगस्टपासून ‘सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस’मधील स्लीपर श्रेणीची प्रतिक्षा यादीचे तिकीट आरक्षण बुधवारीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे कोकण प्रवाशांना या गाडीचे स्लीपरचे आरक्षण उपलब्ध होऊ शकले नाही. तसेच एक्सप्रेस सोडता कोकण मार्गावरील अन्य गाडय़ांचे आरक्षण देखील फुल्ल होत आहे. त्यामुळे कोकणात जाण्याऱ्या गणेशभक्तांनी चार महिने आधीच कोकणरेल्वे फुल्ल करून टाकली आहे.

बुधवारी सकाळी बुकींगला सुरुवातच होताच २९ ऑगस्टच्या ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’च्या स्लीपर श्रेणीची प्रतिक्षा यादी ५०० च्या घरात गेली असून, प्रतिक्षा यादीचेही आरक्षण मिळणे बंद झाले आहे. दुपारनंतर हीच यादी ४५२ पर्यंत पोहोचली. तरीही प्रवाशांना या श्रेणीचे तिकीट उपलब्ध झाले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.