दहावीचा निकालात यंदाही कोकण विभागाच अव्वल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 12.21 % ने घटला. मुलींचा निकाल 82.82 % तर मुलांचा निकाल 72.18 % लागला.

दरम्यान, राज्याचा निकाल ७७.१० % लागला आहे.राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. अनुक्रमे पुणे विभाग ८२. ४८ टक्के, नागपूर विभाग ६७.२७ टक्के, औरंगाबाद विभाग ७५.२० टक्के, मुंबई विभाग ७७.०४ टक्के, कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के, अमरावती विभाग ७१.९८ टक्के, नाशिक विभाग ७७.५८ टक्के, लातूर विभाग ७२.८७ टक्के, कोकण विभाग ८८.३८ टक्के लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.