सेंट लुइस (अमेरिका) : भारताची बुध्दिबळपटू कोनेरू हम्पी हिने कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीमध्ये विजय मिळवला आहे. हम्पीने नाना जागनिजे हिचा ८३ चालींमध्ये पराभव करत विजय नोंदविला.
♕ Here is the #CairnsCup leaderboard after 5 rounds ♕ pic.twitter.com/CgAAT70DQZ
— Chess.com (@chesscom) February 12, 2020
या विजयासह कोनेरू हम्पी पाचव्या फेरीनंतर ३ गुणासह स्पर्धेच्या गुणतालिकेत तिस-या स्थानी पोहचली आहे. पुढील फेरीमध्ये हम्पीला अलेक्जेंड्रा कोस्तेनियुक हिचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, स्पर्धेत याआधीच्या फेरीमध्ये हम्पीने पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला होता तर दुस-या फेरीमध्ये तिला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर तिस-या व चौथ्या फेरीमध्ये तिने बरोबरी साधली होती.