सेंट लुइस (अमेरिका) : भारताची आघाडीची बुध्दिबळपटू कोनेरू हम्पी हिने कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीमध्ये विजय मिळवला आहे. हम्पीने रशियाच्या माजी जगज्जेत्या अलेक्झांड्रा कोस्तेनिकला ६१ चालींअखेर पराभूत करत विजय नोंदविला.
Chess: Koneru Humpy defeated former world champion Alexandra Kosteniuk of Russia in 61 moves in the 6th round of the Cairns Cup chess tournament.#CairnsCup pic.twitter.com/UKYfV5wn6O
— Doordarshan Sports (@ddsportschannel) February 14, 2020
या विजयासह कोनेरू हम्पीने सहाव्या फेरीनंतर ४ गुणांसह चीनच्या वेन्जून जूसह संयुक्त आघाडी मिळवली आहे. पुढील फेरीमध्ये हम्पीसमोर अमेरिकेच्या इरिना क्रश हिचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, हम्पीने पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला होता तर दुस-या फेरीमध्ये तिला पराभव पत्कारावा लागला होता. तिस-या व चौथ्या फेरीमध्ये तिने बरोबरी साधली होती. त्यानंतर पाचव्या फेरीमध्ये हम्पीने नाना जागनिजे हिचा ८३ चालींमध्ये पराभव करत विजय नोंदविला होता.