सेंट लुइस (अमेरिका) : भारताची आघाडीची बुध्दिबळपटू कोनेरू हम्पी हिला कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. सातव्या फेरीत झालेल्या लढतीत हम्पीने अमेरिकेच्या इरिना क्रश विरूध्द ५२ चालींअखेर बरोबरी साधली.
या बरोबरीसह कोनेरू हम्पीने सातव्या फेरीनंतर ४.५ गुणांसह चीनच्या वेन्जून जूसह संयुक्त आघाडी मिळवली आहे.
Exclusive interview with #CairnsCup tournament leader, Humpy Koneru 🇮🇳
Humpy talks about her round seven draw against American GM Irina Krush (2422 🇺🇲) with the Black pieces.
Humpy is jointly leading the event with 4.5/7 with only two games to go.
Video: @nigarhan pic.twitter.com/BFxaDmVAmU
— Chess.com – India (@chesscom_in) February 15, 2020
दरम्यान, हम्पीने पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला होता तर दुस-या फेरीमध्ये तिला पराभव पत्कारावा लागला होता. तिस-या व चौथ्या फेरीमध्ये तिने बरोबरी साधली होती. पाचव्या फेरीमध्ये हम्पीने नाना जागनिजे हिचा पराभव करत विजय नोंदविला होता. त्यानंतर सहाव्या फेरीमध्ये हम्पीने रशियाच्या माजी जगज्जेत्या अलेक्झांड्रा कोस्तेनिकला ६१ चालींअखेर पराभूत करत विजय नोंदविला होता.