New Marathi Show: आतापर्यंत टेलिव्हिजनवर गाणी, नृत्यू असे विविध कलागुण दाखवण्यासाठीचे अनेक रिएलिटी शो सुरू झाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धकांना मोठी संधी देखील मिळाली. सोबतच, त्यांचे जगभरात नाव देखील झाले. आता सोनी मराठी वाहिनी खास महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकाराचा शोध घेणार आहे.
सोनी मराठी मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मालिका व कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. आता या चॅनेलने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या नवीन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
आतापर्यंत गाणी, नृत्यू यावर आधारित रिएलिटी शो ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता याही पुढे जात सोनी मराठी कीर्तनकारांवर आधारित कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘एका अद्भुत शोधपर्वाची सुरुवात… शोधत आहोत ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, असे कॅप्शन देत सोनी मराठीने या कार्यक्रमाविषयीचा पहिला प्रोमो शेअर केला आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या राज्याला संतांची भूमी म्हणूनच ओळखले जाते. कीर्तनाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. याच परंपरेचा पुढील टप्पा म्हणून आता सोनी मराठीकडून या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी नोंदणी कशी करता येईल?
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया 7 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी सोनी लिव्ह अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर अॅपवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पेज वर जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. सोबतच, 1-2 मिनिटांचा कीर्तनाचा व्हीडिओ अपलोड करावा लागेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकाराचा शोध घेतला जाणार आहे.