पुणे – जागतिक हवामान बदलाचे पृथ्वीवरील जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत असून अनेक जीव नष्ट होण्याच्या धोका संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे. नुकत्यास समोर आलेल्या अभ्यासानुसार पालीची कमोडो ड्रॅगन ही प्रजाती नष्ट होण्याचा वाटेवर असून योग्य व्यवस्थापनाअभावी येत्या दशकभरात ही प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
कमोडो ड्रॅगन ही जगातील मोठ्या पालींच्या प्रजातींपैकी असून पृथ्वीवर अनेक काळापासून अस्तित्वात आहे. सध्या, दक्षिण पूर्व इंडोनेशियाच्या काही भागांमध्ये सुमारे 4 हजार कमोडो ड्रॅगन शिल्लक आहेत. यामध्ये कोमोडो, रिन्का, नुसा कोडे, गिली मोटांग आणि फ्लोरेस या पाच बेटांचा समावेश आहे.
आतापर्यंत ही प्रजाती आढळली नसलेल्या ठिकाणी या प्रजातीचे स्थलांतर करून ही अभ्यासण्याचा पर्याय शास्त्रज्ञांकडून सुचवण्यात येत आहे.
ऍडेलएड आणि डेकीन या विद्यापीठांनी याबाबत संशोधन केले आहे. “कमोडो ड्रॅगन’ ही पालीची प्रजाती नष्ट होण्यामागे हवामान बदल हे प्राथमिक कारण असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे.
“इकोलॉजी इव्हॉल्यूशन’ या मासिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. याशिवाय पालीची प्रजाती नष्ट होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या संशोधनात नमूद केले आहे.
पाचपैकी तीन बेटांवरील ड्रॅगन पुढील काळात नामशेष होऊ शकतील, असा अंदाज ऍडेलएड विद्यापीठाने वर्तविला आहे. हवामान बदलामुळे कमोडो ड्रॅगनची संख्या हळूहळू कमी होणार असून हवामान बदलामुळे ड्रॅगनच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.