कोलकाता : दक्षिण कोलकात्यातील प्रसिध्द कालीघाट मंदिराच्या जवळून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यांना आदी गंगा नदीच्या किनाऱ्यावर नेऊन तीन किशोर वयीन मुलांनी सामुहिक बलात्कार केला, अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
या मुलींनी कालीघाट पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यानंतर यातील दोन मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अपहरण आणि बाल लैंगिक शोषणविरोधात संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या मुली कालीघाट मंदिराच्या बाहेर भीक मागत होत्या. तेंव्हा आरोपींनी या मुलींचे अपहरण केले. त्यांना आदी गंगा नदीच्या किनाऱ्यावर मचांडी आश्रमाजवळ नेले. तेथे त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. (आदी गंगेगे पात्र गंगेच्या मुळ पात्रापासून 75 किमीवर आहे)
या दोन मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या अहवालाची प्रतिक्षेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. मुलींनी दिलेल्या माहितीवरून आम्ही दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत. तिसऱ्याचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.