#IPL2021 #Qualifier2 #KKRvDC | कोलकाताला विजयासाठी 136 धावांची गरज

अय्यर, हेटमायरने दिल्लीला सावरले

शारजा – शिखऱ धवन वगळता अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर तळात श्रेयस अय्यर व शेमरन हेटमायर यांनी केलेल्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली.

उपांत्य लढतीचे स्वरूप असलेला हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांना समान संधी होती. त्यातही कोलकाताविरुद्धची दिल्लीची कामगिरी आजवर जास्त सरस राहिली असल्याने ते मोटी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात झाल्यावर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

त्यानंतर मार्कस स्टोनिस व कर्णधार ऋषब पंतही साफ अपयशी ठरले. त्याचवेळी फलंदाजीत बढती मिळालेल्या श्रेयस अय्यरने धवनला साथिला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धवन 39 चेंडूत 36 धावा करुन पुन्हा एकदा आततायी फटका खेळून बाद झाला.

दिल्लीचा संघ धावांची शंभरी तरी गाठणार का अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अय्यरला साथ देताना हेटमायरने चांगली खेळी केली. त्याला एक जीवदानही मिळाले मात्र, तोपर्यंत डावातील 19 वे षटक सुरु होते. हेटमायरही आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

त्यानंतर अक्‍सर पटेलच्या साथीत अय्यरने संघाला 5 बाद 135 अशी किमान समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 2 गडी बाद केले. लॉकी फर्ग्युसन व शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक –

दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 135 धावा. (शिखऱ धवन 36, पृथ्वी शॉ 18, मार्कस स्टोनिस 18, शेमरन हेटमायर 17, श्रेयस अय्यर नाबाद 30, अक्‍सर पटेल नाबाद 4, वरुण चक्रवर्ती 2-26, लॉकी फर्ग्युसन 1-26, शिवम मावी 1-27).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.