#IPL2019 : ‘हैदराबाद-कोलकाता’ आमने सामने

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – इडन गार्डन मैदान, कोलकाता

कोलकाता – आयपीएलच्या 12 व्या मोसमातील दुसरा सामना ही दोन वेळचे विजेते विरुद्ध दोन वेळचे विजेते यांच्यादरम्यान होणार असून सनरायजर्स हैदराबाद या संघाने ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्यांदा चषक उंचावला होता तर दुसऱ्यांदा डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात चषकावर आपले नाव कोरले होते. तर, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळताना आयपीएलचा चषक जिंकला होता.

मागच्या मोसमात कोलकाता संघाने माजी कर्णधार गौतम गंभीरने दोन वेळा विजेतेपद मिळवून दिल्यानंतरही त्याला संघातून डच्चू देऊन त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संघाचे नेतृत्व देत बदलाची सुरुवात केली. मात्र हा बदल संघाच्या पथ्यावर पडला नाही आणि संघाला विजेतेपदापासून दूर रहावे लागल्याने यंदा हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतो याकडे कोलकाताच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच कोलकाताने आपल्या संघात कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन सारख्या तगड्या अष्टपैलू खेळाडूंना स्थान देऊन आपला विजेतेपदाचा दावा मजबूत केला असला तरी संघाची प्रमुख मदार असलेले वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीहे दुखापतीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडले आहेत. तर, त्यांच्या जागी बदली म्हणून संदीप वॉरियरला संघात समाविष्ट करून घेतले आहे.

तर, दुसरीकडे, 2016 साली आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे करणाऱ्या हैदराबादच्या संघाने मागील मोसमात उप-विजेतेपद पटकावले होते. यावेळी हैदराबादच्या संघात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने पुनरागमन केले आहे.
मात्र, गत मोसमात कर्णधार असलेला केन विल्यम्सन दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात अद्याप संघात दाखल झाला नसल्याने यंदा विल्यम्सन दाखल होईपर्यंत भुवनेश्‍वर कुमारकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून यंदा हैदराबादने आपला सलामीवीर शिखर धवनच्या बदल्यात दिल्लीच्या अभिषेक शर्मा या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले आहे. मात्र, यंदा त्यांच्यासाठी सलामीला कोण असणार याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नसल्याने त्याबद्दल उत्सुकता त्यांच्या पाठीराख्यांना असणार आहे. तर, वॉर्नरच्या सहभागा बद्दल देखील अद्याप कोणतेही स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.

प्रतिस्पर्धी संघ – कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाईक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, नव्याने दाखल झालेले खेळाडू – जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here