कोलकाता : कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये एका आरोपीनेच नाही तर आणखी काही आरोपींनी महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. मॉर्टेम रिपोर्ट वाचणाऱ्या डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी हा दावा केला आहे.
हा रेप नसून गॅंगरेप आहे
डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 151 ग्रॅम शुक्राणू सापडले आहेत. एका व्यक्तीच्या शुक्राणूंची मात्रा इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे अत्याचारात अनेक आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असल्याचं डॉ. सुवर्ण गोस्वामी म्हणाल्या आहेत. डॉक्टर गोस्वामी या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हरमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त महासचिव सुद्धा आहेत.
काय घडले होते?
9 ऑगस्टच्या सकाळी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतेदह सापडला होता. महिला डॉक्टरच्या संपूर्ण शरीरावर जखम्या आढळल्या होत्या तसंच तिची मानही मोडण्यात आली होती. म्हणजे अत्याचार करुन नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.
डॉक्टरांनी केले आंदोलन
महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधल्या ज्युनिअर डॉक्टर्सने सलग सहा दिवस कामबंद आंदोलन केलं. कँडल मार्च आणि प्रदर्शन करत आरोपीला कठोर शिक्षा करत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते.