वंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी

मराठवाड्यातील 4 उमेदवार घोषित

परभणी – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाआघाडी करण्याची तयारी सुरू असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित विकास आघाडीचे चार उमेदवार जाहीर केले आहेत. परभणीत येथील सत्ता संपादन सभेत त्यांनी माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी जी कोळसे-पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे मराठवाड्यातील नांदेड, लातूरनंतर इतर चार जिल्ह्याचे हे उमेदवार आहेत. औरंगाबादमधून बी जी कोळसे-पाटील, बीडमधून प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबादमधून अर्जुन सलगर, जालन्यातून डॉ. शरद वानखेडे यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील अन्य परभणी आणि हिंगोलीचे उमेदवार येत्या 23 फेब्रुवारीला जाहीर करणार ओ, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी वंचित बहुजन विकास आघाडीने लोकसभेसाठी काही उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत. यात बुलडाण्यातून आमदार बळीराम सिरस्कार, अमरावतीतून गुणवंत देवपारे, नांदेडमधून प्रा. यशपाल भिंगे, यवतमाळ-वाशीममधून प्रा. प्रविण पवार, माढा येथून ऍड. विजय मोरे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.