कोल्हारमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हार – कोल्हार भगवतीपूर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.भगवतीपूर येथील खर्डे पाटील संकुलात शटर उचकटून 4 दुकान फोडली. त्यातून 30 हजार रुपये रोकड चोरांनी लंपास केले. दोन दिवसांपूर्वी कोल्हार येथील कुंकुलोल व्यापारी संकुलात साईश मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली होती. ही घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री 2.55 च्या दरम्यान चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भगवतीपूर येथील कोल्हार सोनगाव रस्त्यालगत असलेल्या व्यापारी संकुलात प्रेरणा मल्टीस्टेट बॅंकेचे शटर उचकटून बॅंकची दिड हजार रूपये चिल्लर व सीसीटीव्ही कॅमेराचे स्टोअर मशिनची तोडफोड केली. त्यानंतर शेजारीच साईश मेडीकल शटर उचकले. झुआरी ऍग्रोमध्ये 17 हजार 500 रुपयाची रोकड तर राजयोग टेड्रर्स पशुखाद्याच दुकानातून सात हजार रुपये लंपास केली. शटरचा आवाज आल्याने परिसरातील लोक जागे झाले पण तोपर्यंत चोरटे पळून गेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चोरट्यांनी आपला मोर्चा कुंकुलोल व्यापारी संकुलातील स्वरूपा सराफाच्या दुकानाकडे वळवला. पण शटरला सेंटर लॉंक आतल्या बाजूला लोखंडी दरवाजा असल्याने ते उघडता न आल्याने चोरटे पळून गेले. हे सर्व चोर सीसीटीव्ही कॅमेरा कैद असून त्याचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)