कोल्हार खुर्दमध्ये आढळला डेंगीचा रुग्ण

कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डेंगीचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तात्काळ गावात धूर फवारणीसह अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गावातील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला आता डेंगीची लागण झाली आहे.

कोल्हार खुर्द परिसरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दर पंधरा दिवसांना डेंगीचा रुग्ण सापडत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, स्थानिक ग्रामविकास अधिकारी, आरोग्याधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिल्यानंतर तालुक्‍यातील प्रशासन खडबडून जागे झाले. दुसऱ्याच दिवशी गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“डेंगी स्वच्छ पाण्यावर तसेच पावसाच्या साठलेले पाण्यावरील डास चावल्याने होतो. गावातील तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे, आठड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, साठवलेल्या पाण्यावर झाकण ठेवणे अशा उपाययोजना करायला हव्यात. गावात वेळोवेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी. हिवताप, सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. येथे सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात.”
-डॉ. संतोष चोळके, आरोग्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गुहा

स्थानिक प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गावात धूर फवारणीचे काम सुरू केले. डेंगीच्या साथीला आवर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आरोग्य विभागाने संवेदनशील पद्धतीने उपापयोजना केल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात ठाण मांडून आहेत. घरोघरी जावून ते डेंगीबाबत माहिती देत आहेत. ग्रामस्थांनी वापरासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी डास प्रतिबंधक धूर फवारणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा एका विद्यार्थिनीला डेंगीची लागण झाली आहे. ही विद्यार्थिनी सध्या संगमेर येथील एका दवाखान्यात उपचार घेत आहे. तिचे पालक रिक्षाचालक असून आई शिवण काम करून उदर निर्वाह करते. गरीब कुटुंबातील या मुलीवर तिच्या पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवकांनी वेळच्या वेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी करून घेणे गरजेचे आहे; मात्र तसे नियमितपणे होत नसल्याने स्थानिक प्रशासनच्या बेजबाबदारपणाबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)