कोल्हापूर – भारताच्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याची निवड झाली आहे. अनिकेत फॉरवर्ड पोझिशनवर खेळणारा खेळाडू असून त्याने भारतात झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतही देशाचे नेतृत्व केले होते.
2022 साली उझबेकीस्तानमध्ये अशियाई चषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. अमिरातीत येत्या 25 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत हे पात्रता सामने होणार आहेत.