कोल्हापूरकर, मतदानातही भारी!

शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदान


पुणे जिल्ह्यात मात्र तुलनेने निरुत्साही वातावरण

पुणे – विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून, टक्केवारीत वाढ झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी 73.04 टक्के तर पदवीधर मतदारसंघासाठी 57.96 टक्के मतदान झाले.

शिक्षक व पदवीधरसाठी सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 86.70 टक्के तर पदवीधरसाठी 68.09 टक्के इतके मतदान झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 58.54 टक्के तर पदवीधरसाठी 44.95 टक्के मतदान झाले.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधरसाठी मंगळवारी मतदान झाले. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना असल्याने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकदीने प्रचार केला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यात राजकीय पक्षांना यश आले.

पदवीधर मतदारसंघातील 4 लाख 26 हजार 257 पैकी 2 लाख 47 हजार 50 मतदारांनी मतदान केले. तर शिक्षक मतदारसंघातील 72 हजार 545 मतदारांपैकी 52 हजार 987 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.