कोल्हापूर – तिलारी घाटात दरड कोसळली

कोल्हापूर – जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून सध्या या मार्गावरून एकरी वाहतूक सुरू आहे. पोलीस , महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तिलारी घाट हा कोल्हापूर आणि गोवा राज्याला जोडणार दुवा आहे. हा घाट अत्यंत धोकादायक असल्याने या मार्गावरून वाहतूक अत्यंत तुरळक असते. आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तिलारी घाटात दरड कोसळली आणि रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. सध्या या ठिकाणी शासकीय अधिकारी , महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दखल झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.