कोल्हापूर | न्यायालय अवमान प्रकरणी अशोक चव्हाणांवर कारवाई करा – चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूर – गायकवाड आयोगाचा अहवाल विधानसभेत एकमताने मान्य झाला आहे. तसच त्यावर राज्यपालांनी सही केली आहे. उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. 102 व्या घटनादुरुस्ती नंतर कायदा करता येत नाही असा अशोक चव्हाण यांचा आक्षेप असेल तर ते सगळ्यावर आक्षेप घेत आहेत.

अशोक चव्हाण उच्च न्यायालयाचा अवमान करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे…किंबहुना भाजपा ही त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई साठी पुढाकार घेईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते

भाजपने मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण दिले. 5 लाख मराठा लोकांचा गायकवाड आयोगाने सर्वे केला आहे. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे उघड झाले आहे. गायकवाड आयोग हा घटनेतल्या चौकटीतला आयोग आहे.

न्यायालयाने या आयोगाचा निर्णय मान्य केला आहे व साधारण स्थिती सुद्धा उच्च न्यायालयाने मान्य केली आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ती आमची हातात हात घालून काम करण्याची तयारी आहे, पण सरकार आम्हाला बोलतच नाही किंबहुना मराठा आरक्षणाबाबत सरकार मधील कोणाचाही अभ्यास नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजाला विश्वासात घेऊन नोकर भरतीबाबत निर्णय घ्यावा अन्यथा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान पिंपळगाव इथं आंदोलकांवरती जोर जबरदस्ती करून आंदोलन संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे आता बीजेपी आंदोलनात उतरेल असही चंद्रकांत यांनी म्हटलं आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.