कोल्हापूर /प्रतिनिधी – करणी काढण्यासाठी एका महिलेला सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. ज्योती अशोक भोसले वय (३२), आणि कमल जाधव (वय ५० रा. दोघे टेंबलाईवाडी) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात यापूर्वीच अमित जाधव (वय ३०) या अटक केली आहे.राजारामपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली.
या गुन्ह्यातील फिर्यादी शाहिन मेहबूब मुल्ला या महिलेला ज्योती भोसले, भाग्यश्री जाधव, अमित जाधव, कमल जाधव यांनी ‘ तुला कोणी तरी करणी केली आहे, ती काढली नाहीतर कोप होईल’ अशी भिती दाखवली. शाहीनला करणीची भिती दाखवल्यानंतर तिने वेळोवेळी आईचे दागिने तिघां संशयितांना दिले. गेल्या दोन वर्षात सहा लाख सहा हजार रुपये दागिने दिले. या दागिन्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी शाहीन मुल्ला यांनी राजरामपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी अमित जाधवला ताब्यात घेऊन आज शुक्रवारी ज्योती भोसले आणि कमल जाधव यांना अटक केली. दोघींना कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच ऑक्टोबर पोलिस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला आहे.