कोल्हापूर – कोल्हापूर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत असताना शाहूनगर परिसरात एका गाईने आज अक्षरशः उच्छाद मांडला. दैव बलवत्तर म्हणून कोणाचा जीव गेला नाहि मात्र नागरिक जखमी झाले आहेत.
गाईमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शाहूनगर परिसरातील एका घराच्या दारात तिने धक्का देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सुमारे वीस जण जखमी झाले. स्थानिकांनी तिला हाकलण्याचा प्रयत्न केला पण गाय इतकी आक्रमक झाली की तिने उच्छाद मांडला.
या गायीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे समजते. सायंकाळी या गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपासून प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठाण मांडून बसणे हे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहे. काही जनावरांचे मालक त्यांना नको असलेले जनावरे रस्त्यावर सोडून देतात. महापालिकेने अशा मालकावर कारवाई केली मात्र मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे.