कोल्हापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मध्यरात्री मोठी कारवाई; 21 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

आयशर टेम्पोतून छुप्या कप्प्यात लपवली होते दारूचे बाॅक्स

कोल्हापूर – राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथे मोठी कारवाई करत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या आयशर ट्रकमध्ये छुपे कप्पे करून त्यात दारूचा मोठा साठा लपवण्यात आला होता. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले इथून गोवा बनावटीच्या मद्य साठ्याची बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले जांभुळवाडी येथे जंगलात काही लोक गोवा बनावटीची दारू एका आयशर टेम्पोत छुपे कप्प्यात भरत असल्याच निदर्शनास आले.

दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच या मद्याची वाहतूक करणारे तिथून पसार झाले. यावेळी भरारी पथकाने गोवा बनावटीच्या मद्याचे सुमारे 21 लाख रुपये किमतीचे 329 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 10 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा सुमारे एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.