कोल्हापूर – कन्नडीकांनी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख यांच्या वाहनावर केलेला भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या फलकाची तोडफोड, तसेच मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेच्यावतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या गांधीनगर येथील कन्नड फलकांना काळे फासून कन्नडीकांना जशास तसे उत्तर देण्यात आले.
शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनी तात्काळ आपले कानडी फलक उतरून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. यावेळी “कन्नडीकांचा धिक्कार असो”, “कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध असो” या घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
तसेच पोलिसांनीही तात्काळ असे कन्नड फलक उतरवण्याच्या नोटीसा संबंधित व्यवसायिकांना बजावाव्यात. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस व व्यापारी जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.