कोल्हापूर : ‘कृषी विधेयक रद्द करा’ या मागणीसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

कोल्हापूर( प्रतिनिधी) – केंद्र सरकारने नवीन आणलेल कृषी विधेयक तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे.

‘मोदी हटाव, देश बचाव’ चा नारा देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यावेळी धनगरी ढोल बडवण्यात आले. मोदी सरकारने नवीन शेती विधेयक आणला आहे. ते त्वरित रद्द करावं, या मागणी सोबतच शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मोफत मिळावे ,शेतीला शेतीपंपाचे वीज कनेक्शन त्वरित मिळावे, शेतीला 24 तास वीजपुरवठा व्हावा, शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळावी यासह अन्य प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.