कोल्हापूर – करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा यंदा प्राथमिक स्वरूपात साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील भवानी मंडपात असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात छत्रपती शाहू महाराज , युवराज संभाजी राजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून परंपरागत पद्धतीने सीमोल्लंघन करण्यात आलं.
दरवर्षी दसरा चौकात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होणारा हा दसरा सोहळा यंदा मात्र कोरोनाच्या संकटामूळ सार्वजनिक रीत्या साजरा न करता प्राथमिक स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सोनं लुटलं.