तब्बल 19 महिने बंद असणारी कोल्हापूर-सातारा पॅसेंजर मंगळवारपासून सुरू

कोल्हापूर –  कोरोनामुळे गेली तब्बल 19 महिने बंद असलेली कोल्हापूर-सातारा पॅसेंजर रेल्वे येत्या मंगळवार19 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आठ डब्यांची डेमो रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. प्रारंभी या पॅसेंजरची एकच फेरी होणार असून नजीकच्या काळात फेऱया वाढविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.

दरम्यान , कोल्हापूर-सातारा पॅसेंजरला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आला आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यापाऱयांना ही पॅसेंजर सोयीची ठरते. इंधनाचे दर वाढल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. कोल्हापूर ते सातारा मार्गावरील हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, कराडसह साताऱयापर्यंतची लोहमार्गाच्या परिसरातील गावांना पॅसेंजरचा लाभ होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.