कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरीत बालक बालकल्याण संस्था इमरतीमधील भोगवटदार अनिल परमाळे यांना महानगरपालिकेच्या घरफाळा विभागामार्फत 21 लाख 4 हजार 719 रुपयांच्या कर आकारणी व दंडाच्या वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीस बजावली असून त्यांना 7 दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती कर अधिक्षक तानाजी मोरे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं. 2 घरफाळा विभाग मधील सि.स.नं. 1517 सी वॉर्डमधील मिळकतमालक कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरीत बालक बालकल्याण संस्था इमरतीमधील भोगवटदार अनिल परमाळे यांना 25 नोव्हेंबर 2020 रोजी मिळकतीमधील थकबाकी संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण 8 कर विषयक नियम 42 मधील असलेल्या तरतुदीनुसार जप्ती पूर्व नोटीस बजावण्यात आली आहे.
या मिळकतीमधील आजअखेर थकबाकी रक्कमेपोटी मिळकतीमधील वापरामध्ये येणाऱ्या क्षेत्रासाठी कर आकारणीमधील मुददल 13 लाख 4 हजार 464 व त्यावरील होणारा दंड 8 लाख 3 हजार 516 असा दि.26 नोव्हेंबर 2020 अखेर एकूण 21 लाख 4 हजार 719 रुपयांच्या वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली असून या भोगवटदारास 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मिळकतीमधील भोगवटदारांनी मिळकतीचा कर न भरल्यास त्या मिळकतीस सीलबंदची कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही कर अधिक्षक तानाजी मोरे यांनी दिला आहे.