कोल्हापूर: गॅंगस्टर रवी पुजारी आणि बिष्णोई गॅंगच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रवी पुजारी आणि बिष्णोई गँगच्या नावाने 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोल्हापूर – गँगस्टर रवी पुजारी आणि बिष्णोई गॅंगच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अजय वालेचा आणि सुमित अडवाणी असे या दोन खंडणीबहाद्दरांचे नाव आहे. गांधीनगर इथल्या व्यापाऱ्यांकडे या दोघांनी तब्बल 20 लाखांची खंडणी मागीतली होती. खंडणी दिली नाही तर नातेवाईकांना संपण्याची सुद्धा धमकी दिली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने आज दोघांनाही अटक केलीये.

ज्यांच्याकडे या दोघांनी खंडणी मागितली होती ते गांधीनगर येथील कापड व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. त्यांचा स्वाभाग अतिशय शांत असल्याने त्याची माहिती काढूनच खंडणीबहद्दरांनी त्यांच्याकडे 20 लाख रुपये खंडणी मागितली. वारंवार खंडणीसाठी फोन येऊ लागल्याने संबंधित व्यापाऱ्याने खंडणीबहद्दरांचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्या दोघांनी व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांना मॅसेज करून खंडणीची मागणी केली.

शिवाय पळवून नेईल अशी धमकी सुद्धा दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितला. त्यानुसार 6 जानेवारी रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात या खंडणीबहद्दरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने सुद्धा 13 जानेवारी पर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

गांधीनगर येथे मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय करणारे व्यापारी आहेत यापूर्वीसुद्धा या व्यापाऱ्यांनी खंडणी बहाद्दरांना कडून वारंवार त्रास होत असल्याच्या घटना समोर आले आहेत अनेक व्यापारी अशा खंडणी बहाद्दरांना भीतीपोटी पैसे देखील देतात मात्र विष्णू यांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेड्या ठोकले आहेत शिवाय यापुढे सुद्धा कोणाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर माझ्याकडे तक्रार द्या असे आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. शिवाय व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची हमी आम्ही देतो असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.