कोल्हापूर – कोल्हापूर-सिंधुदुर्ग कडे जाणाऱ्या करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोकलेन मशीन घेऊन कंटेनर (एमएच 43- यु – 8562) पुण्याहून गोव्याकडे जात होता. करुळ घाटात पायरी घाट नजीक धोकादायक वळणावर कंटेनरचा अचानक चेस तुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक थोडक्यात बचावला असून कंटेनरचे व पोकलेन मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे करुळ घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.