कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर येथील शिये या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या मुलीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत मुलीवर लैंगिक अत्याचार करूनच तिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुलीच्या आईच्या वहिनीच्या भावानेच (जवळच्या नातेवाईकाने) हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी हा पीडित कुटुंबासोबत राहत होता. तो असे काही करेल हे मृत मुलीच्या घरच्यांनादेखील वाटले नाही. अवघ्या 5 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.
काय घडले नेमके?
मुलीचे आई-वडील नातेवाईकाच्या स्वाधीन मुलीला करून कामावरती गेले होते. मुलींकडे लक्ष देऊन त्यांना दिवसभर सांभाळण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या. घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नसल्याने आई-वडील कासावीस झाले होते. नातेवाईकाकडे चौकशी केली असता मुलगी खेळायला न सांगता निघून गेल्याचं सांगत उडवा उडवीची उत्तरे देत होता. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामध्ये मुलगीसह काळा पँट घालणार इसम दिसून आला. पोलिसांनी सेम वर्णणाच्या 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पहिल्यापासूनच संशय बळवलेल्या नातेवाईकाने पोलीसी खाक्या मिळतात गुन्ह्याची कबुली दिली. संध्याकाळी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान हा गुन्हा घडला. अत्याचार केल्यानंतर मुलगी जोरात रडल्याने तिचा गळा दाबून खून केला असे आरोपीने सांगितले आहे.