कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सुभाषनगर नगर ते आर. के. नगर रोडवर कुष्ठरोग इमारती जवळ चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरटा आला होता. त्याला आज (बुधवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून जेरबंद केले.
विजय भगवान पवार (वय २७ रा. दत्त मंदिर, सुभाष नगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मोटरसायकल चोरटा विजय पवार याच्याकडे मिळालेल्या दुचाकीबाबत राजारामपुरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज, भुदरगड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा तर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
सदर चोरट्याला राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, आसिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव यांनी केली.